लता मंगेशकर यांच्या अस्थी आदिनाथ मंगेशकर प्रभुकुंजवर घेऊन जाणार

लता मंगेशकर यांच्या अस्थी आदिनाथ मंगेशकर प्रभुकुंजवर घेऊन जाणार

| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 9:53 AM

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं काल सकाळी 8.12 वाजता निधन झालं. काल सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं काल सकाळी 8.12 वाजता निधन झालं. काल सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिहं कोश्यारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. आज लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या अस्थी घेऊन जातील. मंगेशकर यांच्या कुटुंबातील आदिनाथ मंगेशकर हे लतादीदी यांच्या अस्थी घेऊन प्रभुकुंज या निवासस्थानी जातील. मंगेशकर कुटुंबीय सकाळी 10.30 वाजता शिवाजी पार्क येथे दाखल होईल, अशी माहिती आहे.