VIDEO : भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे – Devendra Fadnavis – Lata Mangeshkar Death

VIDEO : भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे – Devendra Fadnavis – Lata Mangeshkar Death

| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 11:29 AM

गानसम्राज्ञी, भारत रत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. एका स्वर्गीय युगाचा अस्त झाला. त्यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त होत आहे. भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

गानसम्राज्ञी, भारत रत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. एका स्वर्गीय युगाचा अस्त झाला. त्यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त होत आहे. भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या लाडक्या लतादीदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग, क्षण लतादीदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी, स्फूर्ती जागवली.