Ujjwal Nikam : तहव्वूर राणाला भारतात आणणार; काय म्हणाले उज्ज्वल निकम?

Ujjwal Nikam : तहव्वूर राणाला भारतात आणणार; काय म्हणाले उज्ज्वल निकम?

| Updated on: Apr 10, 2025 | 1:55 PM

Ujjwal Nikam On Tahawwur Rana : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला याला भारतात आणलं जात आहे. त्यावर आज सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला याला काही तासांतच भारतात आणण्यात येणार आहे. अमेरिकेकडून त्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर भारतीय पथक अमेरिकेत त्याला आणण्यासाठी गेलं होतं. भारतात परतल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणावर आज पत्रकारांनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना प्रश्न विचारला असता, राणा याला भारतात घेऊन येणं हे आपलं, भारताचं सगळ्यात मोठं यश आहे, अशी प्रतिक्रिया निकम यांनी दिली आहे. बीडमध्ये आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Published on: Apr 10, 2025 01:55 PM