Anil Parab | राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी तिन्ही पक्षातील नेते निर्णय घेतील : अनिल परब

| Updated on: May 17, 2022 | 9:27 PM

तसेच 6 वी जागाही महाविकास आघाडीची असेल तीही सेनेच्या कोट्यातून त्यामुळे त्याला कसं निवडूण आणायचे हे तिन्ही पक्ष पहातील. तर आपल्याला पुर्णविश्वास आहे की तो उमेदवार नक्की निवडूण येणार

Follow us on

मुंबई : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी जुलैमध्ये निवडणूक (Rajyasabha Election) होणार आहे. त्यासाठी भाजपचे दोन तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल इतकं संख्याबळ आहे. अशावेळी सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा देण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. संभाजीराजेंच्या या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिसाद दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचा संभाजीराजेंना पाठिंबा असल्याचं पवार काल म्हणाले होते. मात्र, शिवसेना राज्यसभेसाठी दोन उमेदवार देणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केलं आहे. तसेच शिवसेना सहाव्या जागेवर उमेदवार देणार असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलंय. तर संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास उमेदवारीसाठी त्यांचा विचार केला जाईल, असंही शिवसेनेकडून सांगण्यात आल्याचं कळतंय. दरम्यान याबाबत परब यांना विचारले असता त्यांनी याबाबतीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष बसून ठरवतील असे सांगितले आहे. तसेच 6 वी जागाही महाविकास आघाडीची असेल तीही सेनेच्या कोट्यातून त्यामुळे त्याला कसं निवडूण आणायचे हे तिन्ही पक्ष पहातील. तर आपल्याला पुर्णविश्वास आहे की तो उमेदवार नक्की निवडूण येणार असंही परब यांनी म्हटलं आहे.