Leopard Attack Kolhapur : आधी लपला, बाहेर येताच पोलिसावर हल्ला अन् पुन्हा… बिबट्याचा हा थरारक Video पाहताच चुकेल काळजाचा ठोका

Leopard Attack Kolhapur : आधी लपला, बाहेर येताच पोलिसावर हल्ला अन् पुन्हा… बिबट्याचा हा थरारक Video पाहताच चुकेल काळजाचा ठोका

| Updated on: Nov 11, 2025 | 2:23 PM

कोल्हापूरच्या मध्यवस्तीतील विवेकानंद परिसरात बिबट्या शिरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या बिबट्याने काही स्थानिकांवर आणि एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करत भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. वनविभाग, अग्निशमन दल आणि पोलीस दलाकडून बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

कोल्हापूर शहरातील विवेकानंद परिसरात बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यवस्तीतील या भागात बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली. या बिबट्याने काही स्थानिकांवर आणि नंतर एका पोलीस कर्मचाऱ्यावरही हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. स्थानिकांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली.

वनविभागाचे पथक, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्या एका चेंबरमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी आणि पकडण्यासाठी विशेष सापळा रचण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Published on: Nov 11, 2025 02:22 PM