हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा घणाघाती आरोप

| Updated on: Apr 26, 2024 | 2:11 PM

'अमरावतीमध्ये तर कुठेही अघोरी कृत्य होऊ शकेल. वर्ध्यामध्ये भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबायला लावणं आणि मग मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग', संजय राऊतांचा गंभीर आरोप

Follow us on

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यात पहिल्या टप्प्यातील पाच जागांसाठी मतदान झालं असून आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय. या दरम्यान, काही मतदारकेंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे EVM मशीन बंद असल्याने मतदारांना माघारी जावं लागल्याचे पाहायला मिळाले. यासदंर्भात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना सवाल केला असता त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. अमरावतीमध्ये तर कुठेही अघोरी कृत्य होऊ शकेल. वर्ध्यामध्ये भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबायला लावणं आणि मग मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असू शकतो आणि संध्याकाळ नंतर त्या ईव्हीएम मशीन चालू होतात आणि नंतर ज्यांना हव्या आहेत, त्या झुंडी तिथे उभ्या राहतात. सकाळी येणाऱ्या मतदारांना ना उमेद करणं, निराश करून परत पाठवणं हे या निवडणुकीच्या यंत्रणेतील मोदीकृत भाजपाचे षडयंत्र आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी घणाघाती आरोप केला.