LPG Gas Price : मे महिन्याच्या सुरुवातीलाच मोठी Good News… गॅस सिलिंडर स्वस्त, नवी किंमत किती?
आता व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत १४.५० रुपयांची कपात झाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक वापर करणाऱ्यांना या कपातीचा मोठा फायदा झाला आहे. त्यांचा खर्च कमी झाला आहे.
एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आल्याची आनंदाची बातमी समोर येत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच येणारी ही बातमी आनंदाची आहे. व्यवसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरचे दर सिलिंडरमागे १४. ५० रूपयांनी कमी झाले आहे. मात्र घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे असेच असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाईने डोकं वर काढल्याने सर्वसामान्य नागरिक चांगलेच त्रस्त असल्याचे पाहायला मिळालं होतं. गेल्या दहा वर्षांत गॅस सिलिंडरच्या किंमती दुप्पट झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. मात्र या महिन्याच्या सुरुवातीलाच व्यवसायिक वापरातील एलपीजी गॅसच्या किंमती घसरल्याने ग्राहकांना आता हॉटेलिंगचा आनंद घेता येणार आहे. सलग दुसर्यांदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. १ एप्रिल रोजी दिल्लीत सिलिंडरची किंमत ४१ रुपयांनी स्वस्त झाली.
Published on: May 02, 2025 12:33 PM
