LPG Price Hike : सर्वसामान्यांना मोठा झटका, LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी…
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाच्या लाभार्थ्यांना जे सिलेंडर आत्तापर्यंत ५०० रुपयांना मिळत होते, ते आता ५५० रुपयांना मिळणार आहेत. त्याचवेळी एलपीजी सिलेंडर गॅसची किंमत ८०३ रुपयांवरून ८५३ रुपयांपर्यंत वाढणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांसह गृहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने आज एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे. सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली असून याआधी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार, ८ एप्रिलपासून एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर ५० रुपयांनी वाढ होणार आहे. तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडणार असल्याचे दिसतंय. उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमत ५० रूपयांनी वाढली आहे. उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळणारं सिलेंडर आता ५०० रूपयांऐवजी ५५० रूपयांना मिळणार आहे. तर दुसरीकडे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीदेखील ५० रूपयांनी वाढल्या असल्याने आता एलपीजी सिलेंडर ८०३ रूपयांऐवजी आता ८५३ रूपयांना मिळणार आहे. सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे.
