Anna Naik : अण्णा नाईक अर्थात माधव अभ्यंकरांची आंबोली घाटात सपत्निक भटकंती
रात्रीस खेळ चाले मालिकेतले अण्णा नाईक अर्थात माधव अभ्यंकर आता पुन्हा एकदा फिदा झाले आहेत. मात्र ते यावेळी शेवंतावर नाहीत तर आंबोलीतले निसर्ग सौंदर्य त्यांना खूपच आवडले आहे. अण्णा नाईक यांनी सपत्नीक आंबोली घाटाला भेट दिली आणि निसर्गानं उधळण केलेल्या आंबोलीवर ते बेहद्द खुश झाले.
मुंबई : रात्रीस खेळ चाले मालिकेतले अण्णा नाईक अर्थात माधव अभ्यंकर आता पुन्हा एकदा फिदा झाले आहेत. मात्र ते यावेळी शेवंतावर नाहीत तर आंबोलीतले निसर्ग सौंदर्य त्यांना खूपच आवडले आहे. अण्णा नाईक यांनी सपत्नीक आंबोली घाटाला भेट दिली आणि निसर्गानं उधळण केलेल्या आंबोलीवर ते बेहद्द खुश झाले. आंबोलीत त्यांनी दोन दिवस मुक्काम करत संपूर्ण परिसर पाहिला. आंबोलीतील धबधब्यांवर अण्णा जाम खुश झाले. अण्णांच्या पत्नीनेही इथल्या निसर्ग सौंदर्याचा आणि अविष्कारांचा मनमुराद आंनद लुटला.
