महादेव मुंडे हत्या प्रकरण: ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार
महादेव मुंडे यांच्या हत्येला 21 महिने पूर्ण झाली असतानाही आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्याय मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंडे कुटुंब एसआयटी किंवा सीआयडी चौकशीची मागणी करत आहे. ज्ञानेश्वरी मुंडे आज मुंबईला रवाना झाल्या असून उद्या मुख्यमंत्र्यांशी भेटतील आणि गेल्या 21 महिन्यांची व्यथा त्यांच्यासमोर मांडतील.
महादेव मुंडे यांच्या हत्येला 21 महिने उलटूनही अद्यापही आरोपी फरारच आहेत. या प्रकरणात आता एसआयटी आणि सीआयडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मुंडे कुटुंबीयांकडून केली जात आहे. त्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्ञानेश्वरी मुंडे आज, 30 जुलै रोजी आपल्या कुटुंबियांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. यापूर्वीही त्यांनी न्याय मिळवण्यासाठी कठोर पावले उचलली होती. उद्या मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट होणार असून, गेल्या 21 महिन्यांतील आपली व्यथा त्या त्यांच्यासमोर मांडणार आहेत. ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांकडे नेमकी कोणती मागणी करणार आणि फडणवीस या प्रकरणात काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 30, 2025 05:37 PM
