ती जायला तयार नव्हती, तिला.. ; महादेवी हत्तीनीच्या आठवणीने माहूत इस्माईल चाचांना अश्रु अनावर

ती जायला तयार नव्हती, तिला.. ; महादेवी हत्तीनीच्या आठवणीने माहूत इस्माईल चाचांना अश्रु अनावर

| Updated on: Jul 31, 2025 | 5:10 PM

नांदणी मठातील महादेवी हत्तीणीचे वनतारातील स्थलांतरामुळे तिचा 35 वर्षांचा घर ओस पडला आहे. हत्तीखाण्यात तिच्यासाठी ठेवलेले अन्न अबाधित आहे, तर तिची काळजी करणारे माहूत इस्माईल चाचा उदास आहेत.

भूषण पाटील, प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये हलवण्यात आल्यानंतर, गेली 35 वर्षे तिचे घर असलेला नांदणी मठातील हत्तीखाना आता ओस पडला आहे. काही दिवसांपूर्वी तिच्यासाठी ठेवलेली केळी आणि इतर खाद्यपदार्थ हत्तीखाण्यात न खाल्लेले तसेच पडून आहेत. इतकेच नव्हे, तर अनेक वर्षे महादेवी हत्तीणीची काळजी घेणारे माहूत इस्माईल चाचा हत्तीखाण्यात उदास मनाने बसलेले आहेत.

महादेवी हत्तीणीच्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. “महादेवी हत्तीण नांदणी मठ सोडायला तयार नव्हती, तिला जबरदस्तीने गुंगीचे औषध देऊन नेले,” असा आरोप इस्माईल चाचांनी केला आहे. आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांनी नांदणी मठातील या ओस पडलेल्या हत्तीखाना परिसराचा आढावा घेतला आहे.

Published on: Jul 31, 2025 05:10 PM