MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 24 November 2021

| Updated on: Nov 24, 2021 | 11:10 AM

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज 11 वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. आजचा दिवस हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा असून, या बैठकीमध्ये संपावर तोडगा निघेल  अशी अपेक्षा आहे.

Follow us on

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज 11 वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. आजचा दिवस हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा असून, या बैठकीमध्ये संपावर तोडगा निघेल  अशी अपेक्षा आहे. दरम्यान त्यापूर्वी  मंगळवारी आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये तब्बल दोन तास बैठक झाली.

याबाबत  माहिती देताना अनिल परब यांनी म्हटले आहे की, कोर्टाने विलीनीकरणाचा विचार करण्यासाठी समिती नेमली आहे. समितीचा जो काही अहवाल येईल तो आम्ही मान्य करू. पण तोपर्यंत संप चालू राहू शकत नाही. त्यामुळे कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांसोबत सकारात्मक चर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आज  अकरा वाजता होणाऱ्या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.