MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 29 June 2021
आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो. म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे आणि यांचा रिंगमास्टर वेगळाच असणार!, अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेला टोला लगावलाय.
काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात झालेल्या ओबीसी चिंतन बैठकीत शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. व्यासपीठावरील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडे पाठवा असं सांगितलं. त्यावर वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला आहे. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावरुनच आता भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय.
सन्माननीय मंत्री महोदय विजय वडेट्टीवार हे असे म्हणाले की, आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो. म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे आणि यांचा रिंगमास्टर वेगळाच असणार!, अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेला टोला लगावलाय. राणे यांनी ट्वीट करुन वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर भाष्य करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नारायण राणे हे शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडत नसल्याचं या ट्वीटवरुन पुन्हा एकदा पाहायला मिळालं.
