MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 APM | 4 October 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 APM | 4 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 7:49 AM

या ठिकाणी गुगल पे द्वारे बेट स्वीकारून ऑनलाईन सॉफ्टवेअरवर त्याची नोंद केली जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळं बेटिंग सुरू असतानाच पोलिसांनी रंगेहाथ तीन बुकींना अटक केली. धर्मेंद्र बजाज, राहुल बजाज आणि चिरंजीव अनिल आहुजा अशी या तीन बुकींची नावं आहेत.

उल्हासनगरात आयपीएल सामन्यांवर सुरु असलेल्या बेटिंगचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय. तसंच तीन बुकींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांकडून 25 लाख रुपये रोख, लॅपटॉप, मोबाईल फोन्स, ट्रान्समिशन मशीन जप्त करण्यात आली.

उल्हासनगरच्या कॅम्प 3 भागातील थायरासिंग दरबार परिसरात माँ बजाज व्हिला नावाचा बंगला आहे. या बंगल्यात काही बुकी आयपीएल सामन्यांवर बेटिंग करत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेनं शनिवारी आयपीएल मॅच सुरू असताना या बंगल्यावर धाड टाकली.

या ठिकाणी गुगल पे द्वारे बेट स्वीकारून ऑनलाईन सॉफ्टवेअरवर त्याची नोंद केली जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळं बेटिंग सुरू असतानाच पोलिसांनी रंगेहाथ तीन बुकींना अटक केली. धर्मेंद्र बजाज, राहुल बजाज आणि चिरंजीव अनिल आहुजा अशी या तीन बुकींची नावं आहेत.

या तिघांकडून 25 लाख रुपये रोख, लॅपटॉप, मोबाईल फोन्स, ट्रान्समिशन मशीन जप्त करण्यात आली. सकाळी 4 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.