MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 5 August 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 5 August 2021

| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 4:22 PM

नांदेड विद्यापीठातील वसतिगृहाचे उद्घाटन करण्याचं राज्यपालांनी टाळलंय. उदघाटन करण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या समोरून राज्यपालांचा ताफा गेला, मात्र त्यांनी तिथे थांबून साधी पाहणीही केली नाही.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSinh Koshyari) आज नांदेड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते नांदेड विद्यापीठातील वसतीगृहाचं उद्घाटन पार पडणार होतं. मात्र आरोप प्रत्यारोपानंतर आणि राजकीय धुराळ्यानंतर राज्यपालांनी एक पाऊल मागे घेतलं आहे.  नांदेड विद्यापीठातील वसतिगृहाचे उद्घाटन करण्याचं राज्यपालांनी टाळलंय. उदघाटन करण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या समोरून राज्यपालांचा ताफा गेला, मात्र त्यांनी तिथे थांबून साधी पाहणीही केली नाही. उद्घाटन नाही तर नाही कमीत कमी राज्यपाल तिथे थांबून वसतीगृहाची पाहणी तरी करतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र संभाव्य वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी उद्घाटन टाळून होणारा वादही टाळला.