Maharashtra Assembly : नाना पटोले अन् आव्हाडांची गळाभेट, तर गिरीश महाजन, मुंडे अन् जयंत पालटांमध्ये गप्पा, बघा नेमकं काय झालं?

Maharashtra Assembly : नाना पटोले अन् आव्हाडांची गळाभेट, तर गिरीश महाजन, मुंडे अन् जयंत पालटांमध्ये गप्पा, बघा नेमकं काय झालं?

| Updated on: Jul 01, 2025 | 4:08 PM

आज नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं. विधानसभा अध्यक्षांच्या टेबलजवळ जाणं आणि राजदंडाला स्पर्श यावरून नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं.

विधानभवन परिसरामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि शिंदेंच्या शिवसेनेतील गुलाबराव पाटील यांची भेट झाल्याचे पाहायला मिळाले. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज नाना पटोले यांना एका दिवसाकरता निलंबित करण्यात आलं. त्यानंतर विधानभवन परिसरामध्ये नाना पटोले आणि गुलाबराव पाटील यांची भेट झाली. हे दोघेही नेते तसं बघायला गेलं तर आक्रमक… हे दोघेही नेते विधानसभेमध्ये आक्रमकपणे आपली बाजू लावून धरतात आणि याच दोन आक्रमक नेत्यांची भेट या विधानभवनाच्या परिसरामध्ये झाली.

तर दुसरीकडे तर नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड यांची देखील गाळाभेट झाली. विधानभवन परिसरात दोघांची भेट झाली असून यावेळी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी नाना पटोले यांचं समर्थन केलेला आहे. यासह विधानभवन परिसरामध्ये गिरीश महाजन, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांचा देखील संवाद रंगताना दिसला. विधानभवन परिसरामध्ये तीनही नेत्यांचा संवाद झालेला आहे. आज अधिवेशनाच्या निमित्ताने सगळेच नेते विधानभवनात एकत्र जमले होते.

Published on: Jul 01, 2025 04:08 PM