Bhaskar Jadhav : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भास्कररावांनी सरकारचे वाभाडे काढले
Vidhansabha Adhiveshan LIVE : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून गदारोळ झालेला बघायला मिळालं.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. आज देखील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानवरून विरोधकांनी शेतकऱ्यांना धारेवर धरलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सभागृहात सरकारचे चांगलेच वाभाडे काढलेले बघायला मिळालं.
यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, मे महिन्यात अवेळी पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 14 मे पासून रोजच पाऊस सुरू झाला. या पावसाने मोठी दाणादाण उडवली आहे. मराठवाड्यातील व विदर्भातील 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही आकडेवारी जानेवारी ते मार्च पर्यंतच्या आहेत. वर्षभरात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मागच्या निवडणुकीच्या वेळी त्यांना आश्वासने दिली होती. आम्ही सातबारा कोरा करू असे सांगण्यात आले. पण आता हे सरकार म्हणत आहे कर्जमाफी करू, पण योगयावेळी करू. लाडक्या बहिणींना म्हणाले 2100 रुपये देणार, नाही दिले. हे आश्वासने केवळ निवडणुकीपूर्ते होते, अशी टीका देखील यावेळी जाधव यांनी केली.
