Maharashtra Assembly : चड्डी बनियन गँगचा धिक्कार असो… विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या आंदोलनानं वेधलं लक्ष, अंगावर बनियान अन् हातात..
विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं. यामध्ये महाविकास आघाडीतील सचिन अहिर, शशिंकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, अंबादास दानवे यांनी टॉवेल आणि बनियानवर हे आंदोलन करत सत्तेतील मंत्री नेत्यांवर निशाणा साधला
महाराष्ट्रात सध्या राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी अजबच आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीतील आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर चड्डी बनियान गँग अशा घोषणा देत आंदोलन केलं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावर विरोधकांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. यावेळी सचिन अहिर, शशिंकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, अंबादास दानवे यांनी बॅनियान आणि रूमालही गुंडाळल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो असे फलकही विरोधकांच्या हाती पाहायला मिळाले.
चड्डी बनियान गँगचे पोस्टर आणि बनियान घालून विरोधकांनी केलेले हे आंदोलन सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी अधिवेशनादरम्यान केले. या आंदोलनामुळे अधिवेशनातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. मात्र अशा घोषणा आणि आंदोलने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाहीत आणि यातून विरोधक आपला रोष आणि मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.
