Coldrife Cough Syrup Ban : जीवघेण्या अन् मुलांच्या किडन्या निकामी करणारं खोकल्याचं औषध महाराष्ट्रात बॅन, मृत बालकांचा आकडा 18 वर..

Coldrife Cough Syrup Ban : जीवघेण्या अन् मुलांच्या किडन्या निकामी करणारं खोकल्याचं औषध महाराष्ट्रात बॅन, मृत बालकांचा आकडा 18 वर..

| Updated on: Oct 06, 2025 | 10:52 PM

कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे देशभरात 18 बालकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील मुलांचा समावेश आहे. या जीवघेण्या सिरपमध्ये 48.6% डायथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक आढळला आहे, ज्यामुळे मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू होतो. महाराष्ट्रात आता या कोल्ड्रिफ सिरपवर बंदी घालण्यात आली आहे.

खोकल्याच्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे देशभरात आतापर्यंत 18 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मृतांमध्ये मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील सहा बालकांचा समावेश आहे, ज्यांचे नागपूरच्या वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. या गंभीर घटनेनंतर महाराष्ट्रातही तात्काळ कोल्ड्रिफ सिरपच्या विक्री आणि वापरास बंदी घालण्यात आली आहे.

तपासणीमध्ये असे निष्पन्न झाले आहे की, चेन्नईस्थित श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीद्वारे उत्पादित कोल्ड्रिफ कफ सिरपमध्ये 48.6% डायथिलीन ग्लायकोल हे विषारी रसायन आहे. हा घटक वाहनांच्या ब्रेक ऑइलमध्ये वापरला जातो आणि मानवी शरीरात मूत्रपिंड निकामी करून मृत्यूला कारणीभूत ठरतो.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, आरोग्य विभाग या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन अंमलबजावणी करत आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांच्याकडे कोल्ड्रिफ सिरप असल्यास ते त्वरित वापरू नये आणि नष्ट करावे.

Published on: Oct 06, 2025 10:52 PM