महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन पोलीस शहीद तर एकजण गंभीर

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन पोलीस शहीद तर एकजण गंभीर

| Updated on: Feb 20, 2023 | 12:45 PM

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात दोन पोलीस शहीद झालेत. तर एकजण गंभीर जखमी आहे. पाहा...

गोंदिया : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात दोन पोलीस शहीद झालेत. तर एकजण गंभीर जखमी आहे. छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीअंतर्गंत आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास 10-12 महिला पुरुष नक्षल्यांच्या टोळीने विनाशस्त्र चहा पिण्याकरीता गेलेल्या दोन पोलिसांना ठार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून जंगलात सर्चिंग सुरु करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह आणि ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रासह मोटारसायकलने चहा पिण्याकरीता गेले. आधीच त्या परिसरात दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तरएकजण जखमी झाला आहे. यावेळी नक्षलवाद्यांनी मोटारसायकलला आग लावून घटनास्थळावरुन पळ काढला.

Published on: Feb 20, 2023 12:45 PM