Devendra Fadnavis Video : मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलं… ‘त्यांचा राजीनामा मी स्वीकारला आता पुढील कारवाई…’

Devendra Fadnavis Video : मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलं… ‘त्यांचा राजीनामा मी स्वीकारला आता पुढील कारवाई…’

| Updated on: Mar 04, 2025 | 11:36 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात मोठी माहिती दिली आहे. अधिवेशनासाठी विधानभवनात दाखल होताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात मोठी माहिती दिली आहे. अधिवेशनासाठी विधानभवनात दाखल होताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. पुढील कारवाई करता हा राजीनामा राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारुन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे”, असं वक्तव्य करत फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर आपली पहिली प्रतिक्रिया देत राजीनामा घेतल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काही सत्ताधारी आमदारांसह विरोधकांकडून केली जात होती. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असून सीआयडीच्या आरोपपत्रात वाल्मिक कराडच मास्टर माइंड असल्याच समोर आल्यानंतर ही मागणी अधिक जोर धरू लागली होती. अखेर आज मुंडेंनी त्यांच्या पीएमार्फत मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

Published on: Mar 04, 2025 11:36 AM