Harshwardhan Sapkal Video : ‘औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखाच’, काँग्रेसच्या बडया नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

Harshwardhan Sapkal Video : ‘औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखाच’, काँग्रेसच्या बडया नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

| Updated on: Mar 16, 2025 | 2:38 PM

औरंगजेब जेवढा क्रूर शासक होता, आज फडणवीस सुद्धा तेवढेच क्रूर आहेत. नेहमी धर्माचा आधार घेतात” असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

‘औरंगजेब क्रूर शासक होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर’, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात वादाची ठिणगी पडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. इतकंच नाहीतर औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीसांचा कारभार एकसारखाच असल्याचे म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांची तुलना थेट औरंगजेबाशी केल्याचे पाहायला मिळत आहे. “औरंगजेब हा क्रूर शासक होता. त्याने स्वत:च्या वडिलांना जेलमध्ये टाकलं. नेहमी औरंगजेब धर्माचा आधार घेत होता. तो कधी हजला गेला नाही. औरंगजेब जेवढा क्रूर शासक होता, आज फडणवीस सुद्धा तेवढेच क्रूर आहेत. फडणवीस देखील नेहमी धर्माचा आधार घेतात” , असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केल्यानंतर भाजपच्या प्रवीण दरकेर यांवर प्रत्युत्तर देत हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पलटवार केला आहे.

Published on: Mar 16, 2025 02:34 PM