Ajit Pawar : आम्हाला सन्मान द्या… सरकारचा ‘तो’ नवा GR चर्चेत का? सरकारचा प्रशासनावर वचक नाही!

Ajit Pawar : आम्हाला सन्मान द्या… सरकारचा ‘तो’ नवा GR चर्चेत का? सरकारचा प्रशासनावर वचक नाही!

| Updated on: Nov 24, 2025 | 10:45 AM

महाराष्ट्र सरकारने लोकप्रतिनिधींना सन्मान देण्याबाबत जीआर काढला आहे, त्यानुसार अधिकाऱ्यांनी नेत्यांशी नम्रपणे वागण्याचे निर्देश आहेत. दुसरीकडे, जालन्यातील सभेत अजित पवारांनी खुर्च्या न मिळाल्याने पोलिसांना झापले. या परस्परविरोधी घटनांमुळे नेत्यांचा अधिकाऱ्यांवरील वचक आणि सामान्य नागरिकांशी वागणूक याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती अनेक प्रश्न निर्माण करत आहे. एका बाजूला, सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आमदार, खासदारांचा सन्मान करावा, ते भेटीला आल्यास उभे राहावे, त्यांचे म्हणणे नीट ऐकावे आणि फोनवर नम्र भाषेचा वापर करावा, अशा सूचना देणारा शासन निर्णय (जीआर) सरकारने काढला आहे. या सूचनांचे उल्लंघन केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला आहे. लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जाते.

दुसऱ्या बाजूला, नेत्यांकडूनच सरकारी यंत्रणेवर रूबाब दाखवला जात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जालन्यातील एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उमेदवारांना खुर्च्या न मिळाल्याने तिथे उपस्थित पोलिसांना झापले. उमेदवारांना खुर्च्या पुरवणे हे पोलिसांचे काम आहे का, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. या दोन परस्परविरोधी घटनांमुळे राज्याच्या राजकारणात सन्मानाचा जीआर अन् पोलिसांवर रूबाब करणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. सामान्य जनतेशी अधिकाऱ्यांनी कसे वागावे, याबाबत जीआर का नाही, असे प्रश्नही विचारले जात आहेत.

Published on: Nov 24, 2025 10:45 AM