Uddhav Thackeray : आमच्या हातात तर काहीच नाही, पण… नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना काय म्हणाले?
लातूर येथील शेतकऱ्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या विध्वंसाची ही घटना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कठीण परिस्थितीचे प्रतीक आहे.
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीबाबत आपली व्यथा मांडली आहे. लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. शेतकऱ्यांनी यावेळी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली. माझ्या हातात काही नसले तरी, तुम्हाला साथ देण्यासाठी आलो आहे. कोणीही खचू नका आणि वेडवाकडं पाऊल उचलू नका, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्त आणि शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आवाहन केलं.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला आहे आणि त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याच शेतकऱ्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे थेट लातूरमध्ये दाखल झालेत. मराठवाड्यात पहिल्यांदा उलट झालंय. पाणीच पाणी झालंय. यातून आपल्याला बाहेर पडायला हवं. तुमची मागणी जी आहे कर्जमाफीची ती आहेच. मला त्यात पडायचं नाही. नाहीतर पुन्हा लोक म्हणतील मी राजकारण करतो, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
