Marathwada Heavy Rainfall :  राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, शेतीचं नुकसान अन् मराठवाडा उद्ध्वस्त

Marathwada Heavy Rainfall : राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, शेतीचं नुकसान अन् मराठवाडा उद्ध्वस्त

| Updated on: Sep 17, 2025 | 10:37 AM

महाराष्ट्रातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले असून, घरांनाही पाणी शिरले आहे. शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि तातडीची मदत करण्याची मागणी केली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पावसाचा प्रकोप सुरू आहे. मराठवाडा, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आले आहेत. शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे, घरे पाण्याखाली गेली आहेत आणि अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जालना जिल्ह्यात तर धगफटी सदृश्य पावसामुळे हाहाकार माजला आहे. बीड जिल्ह्यात सांडर चिंचोली गाव पूर्णपणे पाण्याने वेढले गेले आहे. आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी गावात पूर आल्याने शेती आणि जनावरे वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांनी सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि तातडीची आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.

Published on: Sep 17, 2025 10:37 AM