Maharashtra Unlock | महाराष्ट्रात ‘ब्रेक दे चेन’ची नवी नियमावली जारी; काय सुरु ? काय बंद ?

Maharashtra Unlock | महाराष्ट्रात ‘ब्रेक दे चेन’ची नवी नियमावली जारी; काय सुरु ? काय बंद ?

| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 8:11 PM

राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाला आवर घालण्यासाठी नवी नियमावली जारी केली आहे.

मुंबई : राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाला आवर घालण्यासाठी नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार राज्यात 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 चे निर्बंध असणार आहेत. तर नव्या आदेशानुसार 25 जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवता येतील. शनिवारी आणि रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवावी लागणार आहे.. उर्वरित 11 जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार आहेत. या अकरा जिल्ह्यांत शनिवार-रविवारी दुकाने बंद ठेवावे लागतील.