KumbhMela Priest Training : ITI मध्ये आता वैदिक मंत्राचं प्रशिक्षण! महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असा अभ्यासक्रम, सरकारचा ‘तो’ निर्णय वादात

KumbhMela Priest Training : ITI मध्ये आता वैदिक मंत्राचं प्रशिक्षण! महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असा अभ्यासक्रम, सरकारचा ‘तो’ निर्णय वादात

| Updated on: Oct 20, 2025 | 10:56 AM

महाराष्ट्र सरकारने आयटीआयमध्ये वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट हा अल्पमुदतीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कुंभमेळ्यासाठी प्रशिक्षित पुरोहित उपलब्ध करणे हा उद्देश असला तरी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील पारंपरिक पुरोहित कुटुंबांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. यामुळे त्यांच्या रोजीरोटीवर गदा येईल आणि धार्मिक परंपरांचे उल्लंघन होईल, अशी त्यांची भीती आहे.

महाराष्ट्र सरकारने नाशिकमधील आयटीआयमध्ये वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट नावाचा एक नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा २५० तासांचा अभ्यासक्रम असून, आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैदिक मंत्र आणि संस्कारांचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहितांची संभाव्य कमतरता भरून काढण्यासाठी आणि अल्पमुदतीचे रोजगारक्षम प्रशिक्षण देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

मात्र, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक व पारंपरिक पुरोहितांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. त्यांच्या मते, पौरोहित्य हे केवळ तांत्रिक प्रशिक्षण नसून त्यासाठी वेदानुष्ठान आणि सखोल धार्मिक ज्ञानाची आवश्यकता असते. असे शॉर्ट कोर्सेस सुरू केल्याने धार्मिक परंपरा आणि रीतीरिवाजांचे उल्लंघन होईल, तसेच त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या रोजगारावर परिणाम होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. पुरोहितांनी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

Published on: Oct 20, 2025 10:56 AM