‘सरकारकडून गोविंदासाठी 10 लाखांचं विमाकवच’, शिंदे यांचं वक्तव्य

| Updated on: Aug 19, 2022 | 3:34 PM

"गोविंदा उत्सवासाठी खास आपण शासनाच्या माध्यमातून 10 लाखांचं विमाकवचदेखील दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यास साहसी खेळाचाही दर्जा दिला आहे. सार्वजनिक सुट्टीदेखील जाहीर केली आहे. त्यामुळे गोविंदाचा उत्साह दुप्पट झाला आहे", अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. 

Follow us on

“यावर्षी जल्लोष आणि उत्साह खूप जास्त आहे. मी गोविंदा पथकांना शुभेच्छा देतो. सगळ्यांनी काळजी घेऊन थर लावावेत. कुठेही अपघात होऊ नये याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर कोविडचं संकटदेखील गेलेलं नाही. त्याचीही सुरक्षितता पाळून गोविंदा उत्सव साजरा करावा. सर्व तरुण आज रस्त्यावर उतरले आहेत. गोविंदा उत्सवासाठी खास आपण शासनाच्या माध्यमातून 10 लाखांचं विमाकवचदेखील दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यास साहसी खेळाचाही दर्जा दिला आहे. सार्वजनिक सुट्टीदेखील जाहीर केली आहे. त्यामुळे गोविंदाचा उत्साह दुप्पट झाला आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.