Mahayuti News : विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा जल्लोष; खुद्द अजितदादांनी दिल्या विजयोत्सवाच्या घोषणा
Ajit Pawar Celebrate Victory : पावसाळी अधिवेशनात आज महायुतीकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जल्लोष साजरा केला गेला.
पावसाळी अधिवेशनाचा आजपासून तिसरा आठवडा सुरू झाला आहे. यात पहिल्याच दिवशी महायुतीकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोचा दर्जा मिळाल्याचा जल्लोष करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर हा जल्लोष साजरा केला.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याला जोरदार सुरुवात झालेली बघायला मिळाली आहे. युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याचा आनंद सत्ताधारी महायुतीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर नारेबाजी करत साजरा केला. दरम्यान, आजच्या सभागृहात, विशेषतः विधान परिषदेत, विरोधी पक्षातील महायुतीच्या सदस्यांनी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावरून सरकारला जाब विचारण्याची आणि कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. यामुळे सभागृहातील चर्चा तणावपूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
