भाषेच्या नावे हिंसाचार होत असेल तर..; फडणवीसांचा इशारा कोणाला?
भाषेच्या नावे हिंसाचार होत असेल तर कारवाई करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.
भाषेच्या नावे हिंसाचार होत असेल तर कारवाई करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. तर मराठी भाषेसाठी हिंसाचार करणारच असं उत्तर यावर खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. तसंच ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात दुबेंसारखे विषय चर्चेत घेऊ असंही राऊत यांनी म्हंटलं आहे.
महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे. महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे हा आग्रह ठीक आहे. पण ज्याना मराठी बोलता येत नाही त्यांना मारण योग्य नाही. मारहाण करणाऱ्यांवर आमचं सरकार कारवाई करणार. मारहाण करून मराठीत बोलण्याची सक्ती होता कामा नये, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलंय. जो कोणी महाराष्ट्रात येईल, त्याचं आम्ही स्वागत करू, त्याच्याशी कोणतंही गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेऊ, असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे.
Published on: Aug 03, 2025 04:05 PM
