शिवसेना ED च्या निशाण्यावर ? Yashwant Jadhav यांच्या घरी तपास यंत्रणा दाखल
. त्यानंतर यशवंत जाधव यांनी हे पैसे संयुक्त अरब अमिराती येथे हलवले. त्यामुळे १५ कोटी रुपये रोख यशवंत जाधव यांनी दिले हे स्पष्ट होत”असल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप केला होता.
शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी केंद्रीय तपास पथक सीआरपीएफ जवानांसह (CRPF Jawan) पोहोचलं आहे. यशवंत जाधव यांच्यावरती 15 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच ती रक्कम युएईला ठेवली असल्याची चर्चा आहे. “यशवंत जाधव यांनी मनपाच्या टेंडरमधून मिळालेले 15 कोटींचं रुपयांचे मनी लॉण्ड्रिंग केलंय, यशवंत जाधवांनी १५ कोटी रुपये रोख स्वरुपात मनी लॉण्ड्रिंग करणाऱ्या मास्टरमाईंड उदय शंकर महावारला (uday shankar mahawar) दिले आहेत. हे पैसे प्रधान डिलर प्रा. लिमिटेडच्या खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर या कंपनीचा एक रुपयांचा शेअर आणखी पाच कंपन्यांनी पाचशे रुपये दराने घेतला. त्यानंतर हे 15 कोटी यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा झाले. त्यानंतर यशवंत जाधव यांनी हे पैसे संयुक्त अरब अमिराती येथे हलवले. त्यामुळे १५ कोटी रुपये रोख यशवंत जाधव यांनी दिले हे स्पष्ट होत”असल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप केला होता.
