Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक बिनविरोध! अजितदादा पुन्हा एकदा अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी…

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक बिनविरोध! अजितदादा पुन्हा एकदा अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी…

| Updated on: Nov 02, 2025 | 4:00 PM

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक बिनविरोध होणार असून, अजित पवार पुन्हा अध्यक्ष होतील. मुरलीधर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील. अध्यक्षपद दोन-दोन वर्षांसाठी विभागून घेण्यावर सहमती झाली आहे. संध्याकाळी ४ वाजता मुंबईत होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याची अधिकृत घोषणा केली जाईल.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक बिनविरोध होणार असून, अजित पवार पुन्हा एकदा असोसिएशनचे अध्यक्ष बनणार आहेत. या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात अध्यक्षपद दोन-दोन वर्षांसाठी वाटून घेतले जाईल.

या करारांतर्गत, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमधील ५ जागा अजित पवार गटाकडे गेल्या आहेत, तर ७ जागा मोहोळ गटाला मिळाल्या आहेत. महासचिव आणि खजिनदार ही दोन्ही महत्त्वाची पदे मोहोळ गटाकडे असतील. तसेच, उपाध्यक्ष पदाच्या ४ जागांपैकी २ जागा मोहोळ गटाला आणि २ जागा अजित पवार गटाला मिळतील. सहसचिव पदाच्या ४ जागांपैकी देखील २ जागा मोहोळ गटाला आणि २ जागा अजित पवार गटाकडे जाणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा निर्णय दोन्ही गटांनी एकत्रितपणे घेतला आहे. संध्याकाळी ४ वाजता मुंबईमध्ये होणाऱ्या जनरल बॉडीमध्ये या निर्णयाची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Published on: Nov 02, 2025 04:00 PM