Devendra Fadnavis Uncut | पंतप्रधानांचा जीव जाणीवपूर्वक धोक्यात घातला - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Uncut | पंतप्रधानांचा जीव जाणीवपूर्वक धोक्यात घातला – देवेंद्र फडणवीस

| Edited By: | Updated on: Jan 06, 2022 | 8:38 PM

काँग्रेस नेते ज्या बेशरमपणे पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत बोलत आहेत, ती निर्लज्जता आहे. जनतेचा आशीर्वाद घेऊन मोदी आले आहेत. या आशीर्वादामुळे मोदींच्या केसालाही धक्का लागणार नाही, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं.

मुंबई : पंजाब मधील आंदोलक हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. असा आरोप फडणवीसांनी केला. त्यांना पोलिसांनी परवानगी दिली होती, असाही दावा त्यांनी केलाय. त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा 20 मिनिटे थांबून होता. माजी मुख्यमंत्री अमरीनंदर सिंग यांनी सांगितलं की, तिथून पाकिस्तानची सीमा 10 किलोमीटर अंतरावरच होती. आमची राष्ट्रपतींना विनंती आहे, याची दखल देशपातळीवर घेतली जावी. पंतप्रधानांवरील हल्ला हा देशावरील हल्ला असतो. काँग्रेस नेते ज्या बेशरमपणे पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत बोलत आहेत, ती निर्लज्जता आहे. जनतेचा आशीर्वाद घेऊन मोदी आले आहेत. या आशीर्वादामुळे मोदींच्या केसालाही धक्का लागणार नाही, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं.