Ambadas Danve : नोटांचा ढीग, पैशांची बंडलं, आमदाराचा कॉल.. दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEO मध्ये नेमकं काय?
अंबादास दानवेंनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नोटांच्या ढिगाऱ्यासह व्हिडिओ पोस्ट केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दानवेंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, जरांगे पाटलांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी करत सरकारला इशारा दिला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ पोस्ट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओमध्ये दळवी एका व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत असून, त्यांच्या समोर नोटांचा मोठा ढिग असल्याचे चित्र आहे. दानवेंनी या व्हिडिओद्वारे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंना सवाल केला आहे की, शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीला पैसे नसताना आमदारांकडे नोटांचे ढिग कसे? या व्हिडिओवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवी यांनी हा व्हिडिओ फेक असून मॉर्फ केलेला असल्याचा दावा केला आहे. त्यांनी दानवेंना चेहऱ्यासहित व्हिडिओ सिद्ध करण्याचे आव्हान दिले आणि अलिबागमध्ये निषेध मोर्चाचे आयोजन केले.
Published on: Dec 09, 2025 05:45 PM
