ठाकरेंकडे असताना देशद्रोही? अन् भाजप प्रवेशानंतर भगवाधारी? बडगुजरांच्या प्रवेशानं भाजप समर्थकांचं ट्रोलिंग

ठाकरेंकडे असताना देशद्रोही? अन् भाजप प्रवेशानंतर भगवाधारी? बडगुजरांच्या प्रवेशानं भाजप समर्थकांचं ट्रोलिंग

| Updated on: Jun 19, 2025 | 9:06 AM

सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजप समर्थकांच सोशल मीडियामध्ये जोरदार ट्रोलिंग होऊ लागलंय. स्थानिक आमदारांच्या विरोधाला न जुमानता भाजप हायकमांडने बडगुजर यांना प्रवेश दिला. आता भाजपनेच केलेल्या देशद्रोहाच्या आरोपांवर भाजपलाच सवाल विचारले जातायतय

सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशीअंती कोणतीही कारवाई झाली नाही, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलंय. त्यामुळे बडगुजर यांना क्लिन चीट मिळाली का? अशी चर्चा होते आहे. आजपर्यंत बडगुजरांवरच्या आरोपांचं पुढे काय झालं? यावरून भाजपाला सवाल केले जात होते. मात्र तेच बडगुजर आता भाजपात आल्यानंतर चौकशीत काहीही आढळलं नसल्याचे संकेत फडणवीसांनी दिले आहेत. मात्र दुसरीकडे विरोधी सत्ताधारी नेत्यांची जुनी वक्तव्य दाखवून भाजपाला सवाल करतायत.

मुख्यमंत्री फडणवीसांनी जरी बडगुजर यांच्यावरच्या आरोपात काहीही आढळलं नसल्याचं वक्तव्य केलं असलं तरी विरोधकांबरोबर भाजपच्याच आमदारांचे सवाल गंभीर आहेत. भाजप आमदार सीमा हिरे यांच्या दाव्यानूसार. सुधाकर बडगुजर यांच्यावर वेगवेगळे 17 गुन्हे दाखल आहेत. बडगुजरांवर लवकरच मुक्काही दाखल होणार होता ती कारवाई टाळण्यासाठी बडगुजर यांनी भाजपात प्रवेश केलाय, असा आरोप केलाय.

Published on: Jun 19, 2025 09:06 AM