Ajit Pawar : आता काय खुराक सुरु करू? खारीक, खोबरं… अजितदादांचं नेत्यांच्या ‘त्या’ मागणीवर मिश्कील उत्तर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठीशी ताकद मागणाऱ्या नेत्यांना "खारीक, खोबरं खा" असा मिश्किल सल्ला दिला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका मिश्किल वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही नेत्यांनी आपल्या पाठीशी ताकद उभी करण्याची विनंती केली असता, अजित पवारांनी त्यांना अतिशय विनोदी शैलीत उत्तर दिले. अजित पवार म्हणाले, “आता काय उद्यापासून खुराक सुरु करू का? खारीक, खोबरं, जर्दाळू, बदाम, पिस्ते वगैरे खा!”, अजित पवार यांनी असं मिश्कील वक्तव्य केलं आणि एकच हशा पिकला.
तर महामंडळांवरील संधींबाबत बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, निवडणुका संपल्यावर एकत्र बसून यावर विचार केला जाईल. कुणाची कुठे मक्तेदारी नसते आणि “मी मी” म्हणणारे अनेक नेते पराभूत झाले आहेत, तर लोकांच्यात असणारे अनेकदा निवडून आले आहेत, असे सांगत त्यांनी पक्ष हा सर्वांचा परिवार असल्याचे स्पष्ट केले.
Published on: Dec 12, 2025 12:07 PM