NCP वर्धापन दिनाच्या व्यासपीठावर जयंत पाटलांनी सत्कार नाकारला, घोषणा होताच ते उठले अन्… नेमकं घडलं काय?

NCP वर्धापन दिनाच्या व्यासपीठावर जयंत पाटलांनी सत्कार नाकारला, घोषणा होताच ते उठले अन्… नेमकं घडलं काय?

| Updated on: Jun 10, 2025 | 5:18 PM

जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचे संकेत देण्यात आलेत. पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असे जयंत पाटील म्हणाले राजीनामा देऊ नका, जयंत पाटीलांच्या समर्थनात ही घोषणाबाजी त्यानंतर करण्यात आली.

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिले. नव्या चेहऱ्यांना संधी द्या अशी विनंती जयंत पाटलांनी शरद पवारांना जाहीर कार्यक्रमात केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पद सोडू नका, अशी विनंती करत घोषणाबाजी केली. जयंत पाटलांच्या भाषणानंतर सुप्रिया सुळे उठून उभ्या राहिल्या. त्यानंतर प्रशांत जगताप यांनी जयंत पाटलांच्या सत्काराची घोषणा केली शरद पवारांनी जयंत पाटलांचा सत्कार करावा, अशी विनंती प्रशांत जगताप यांनी केली मात्र जयंत पाटीलांनी नम्रपणे सत्कार नाकारला. बघा नेमकं काय घडलं? तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल आक्षेप घेतला होता. सध्या रोहित पवारही पक्षात पद नसल्याने नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जयंत पाटलांनी तरुणांना संधी द्या असं म्हणत प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची तयारी दाखवली अशी चर्चा आहे.

Published on: Jun 10, 2025 05:18 PM