Parth Pawar Land Scam : पार्थ अजित पवार 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणार? 7 दिवस मुदतवाढ अन्…

Parth Pawar Land Scam : पार्थ अजित पवार 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणार? 7 दिवस मुदतवाढ अन्…

| Updated on: Nov 17, 2025 | 10:33 PM

पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीला 40 एकर सरकारी जमीन व्यवहार प्रकरणात 42 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. व्यवहार रद्द केला तरी रक्कम भरावीच लागणार असे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विरोधकांनी सरकार पार्थ पवारांना वाचवत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अंजली दमानियांनी अजित पवारांवर हॉस्पिटल बहाल करण्यावरून नवा आरोप केला.

पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीच्या जमीन व्यवहार प्रकरणात स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या व्यवहारासाठी कंपनीला 42 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि दंड म्हणून भरावे लागणार आहेत. 300 कोटींच्या जमिनीचा व्यवहार दाखवल्याने 7 टक्क्यांप्रमाणे 21 कोटी मुद्रांक शुल्क आणि 21 कोटी दंड असे एकूण 42 कोटी रुपये अमिडिया कंपनीला भरावे लागतील. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यवहार रद्द केला तरी हे 42 कोटी भरावेच लागतील, असे स्पष्ट केले आहे. पार्थ पवारांचे 1 टक्का भागीदार दिग्विजय पाटील यांनी मुदतवाढीसाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणात सरकारने पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न केल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केली असून, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.

Published on: Nov 17, 2025 10:32 PM