जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संपावर; पुण्यातील 68 हजार अधिकारी-कर्मचारी सहभागी

जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संपावर; पुण्यातील 68 हजार अधिकारी-कर्मचारी सहभागी

| Updated on: Mar 14, 2023 | 10:12 AM

Pune Old Pension Scheme Strike : सरकारी आणि निम सरकारी आजपासून संपावर आहेत. राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. पाहा...

पुणे : जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी, निम सरकारी,जिल्हा परिषद, महसूल, महानगरपालिका आदींसह शासनातील सुमारे 32 विभागांचे अधिकारी-कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. या संपात पुणे जिल्ह्यातील 68 हजार अधिकारी-कर्मचारी संपावर आहेत. वारंवार मागणी करूनही शासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. सरकारकडून मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने बेमुदत संप पुकारला आहे. शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, कृषी, सहकार, कारागृह, आरोग्य, साखर संकुल, जिल्हा परिषद, महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, नोंदणी विभाग, भूमी अभिलेख, पालिका, शिक्षक शिक्षकेतर, नगरपालिका, आरटीओ , आशा वर्कर्स आदींसह सुमारे 32 विभागातील कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी होणार आहेत.

Published on: Mar 14, 2023 10:12 AM