Maharashtra Rain Alert : नदीत जाताय? जरा जपून…. कुठं मायलेक तर कुठं जिवलग… एकाच दिवसात 3 मोठ्या घटना अन् 11 मृत्यू, कुठं काय घडलं?

Maharashtra Rain Alert : नदीत जाताय? जरा जपून…. कुठं मायलेक तर कुठं जिवलग… एकाच दिवसात 3 मोठ्या घटना अन् 11 मृत्यू, कुठं काय घडलं?

| Updated on: Jun 16, 2025 | 2:43 PM

गेल्या काही वर्षांपासून कुंडमाळ्यावर अनेक पर्यटक पावसाचा आणि पाण्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. मात्र हा पुल काहिसा जीर्ण अवस्थेत असल्याचे फोटोवरून दिसून आले. याच भागामध्ये पर्यटन करण्यास प्रशासनाकडून बंदीचे बोर्ड देखील लावण्यात आले असताना काल पर्यटकांची मोठी गर्दी झाली आणि पुल कोसळल्याची दुर्घटना घडली.

काल एकाच दिवशी तीन मोठ्या घटना घडल्या, ज्यात 11 जणांचा मृत्यू झालाय. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील निंबादेवी देवस्थान येथील विश्र्वागंगा नदीत बुडून दोघींचा मृत्यू झाला आहे. खामगाव येथील मायलेकीचा विश्वगंगा नदीत बुडून निधन झाल्याची माहिती आहे. देवदर्शनासाठी गेल्या असता नदीत पाय घसरून पडल्याने दोघींचा मृत्यू झालाय.  एकाच कुटुंबातील 7 ते 8 जण नदीत पोहण्यासाठी उतरले होते. यापैकी खामगावं येथील पूनम मयूर जामोदे 32 वर्ष, तिची मुलगी आरोही मयूर जामोदे वय 5 वर्ष या दोघांचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे नांदेडच्या धर्माबाद सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातील बासर येथील गोदावरी नदीपात्रात बुडून पाच भाविकांचा मृत्यू झालाय. सर्वजण हैदराबादवरून बासर येथे देवीच्या दर्शनाला आले असता बोटेने नदीपात्रात गेले आणि स्नान करतांना ही दुर्दैवी घटना घडली. यासह पुणे जिल्ह्यातील मावळ येथील कुंडमळा पुल कोसळला. या दुर्दैवी घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला तर 51 जण जखमी झाले.

Published on: Jun 16, 2025 02:31 PM