Maharashtra Foods : राज्यभरात पावसाचं थैमान, निसर्ग कोपला, शेतकरी ढसाढसा रडला, बघा स्तब्ध करून टाकणारी परिस्थिती

Maharashtra Foods : राज्यभरात पावसाचं थैमान, निसर्ग कोपला, शेतकरी ढसाढसा रडला, बघा स्तब्ध करून टाकणारी परिस्थिती

| Updated on: Sep 28, 2025 | 6:39 PM

पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे द्राक्षांच्या बागेच मोठं नुकसान झालं. कासेगावात द्राक्षाच्या बागेत पाणीच पाणी झालं. संपूर्ण द्राक्षाची बाग उद्ध्वस्त झाली. लाखो रुपये खर्च करून उभी केलेली द्राक्षांची बाग आता तोडावी लागणार आहे. लातूर जिल्ह्यातल्या बेळसांगवी या गावात शेतीच मोठं नुकसान झालंय.

महाराष्ट्रभरामध्ये शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालंय. बऱ्याच ठिकाणी पुराची परिस्थिती आहे. राठवाड्यासह सोलापूर सातारा नाशिक या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसलाय शेतकऱ्यांच उभं पीक पाण्यात गेलंय. त्यामुळे त्यांचं लाखोंच नुकसान झालय त्यामुळे आता तातडीने मदत द्या असा टाहो शेतकऱ्यांनी फोडलाय. साताऱ्याच्या कराड तालुक्यातल्या शामगावमध्ये सोयाबीनच प्रचंड नुकसान झालं शेतात पाणीच पाणी साचलं त्यामुळे शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला.

तर अहिल्यानगरच्या राहता तालुक्यातल्या पिंपळस गावात द्राक्षाची बाग पाण्यात गेली द्राक्षाच्या बागेत पाण्यात पोहतानाचा शेतकऱ्याचा व्हिडिओ वायरल झालाय नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्यातल्या रोशन गावात शेतकऱ्यांनी कुटुंबासह जलसमाधी आंदोलन केलंय. बीड जिल्ह्यातल्या जेवा पिंपरी आणि हिंगणी खुर्द या परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे. शेकडो एकर शेतीला तलावाच स्वरूप आलय. नाशिक जिल्ह्यातल्या येवला, निफाड आणि चांदवड तालुक्यात शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झालंय.

Published on: Sep 28, 2025 06:39 PM