Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रातील या 6 जिल्ह्यांना IMD चा अलर्ट, कुठे कोसळणार अतिमुसळधार पाऊस?
महाराष्ट्रातील पावसाचे संकट अजूनही कायम असून सोमवारी राज्यातील सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बघा कुठे कसा पडणार पाऊस?
केरळ राज्यात मान्सूनने एन्ट्री केल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान खात्याकडून करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्रात कधी मान्सून येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मान्सून पूर्व पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. अशातच भारतीय हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भामध्ये पावसाचा जोर कायम असून विदर्भात गेल्या पंधरा दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यासह मराठवाड्यात पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. मध्य महाराष्ट्रात पाऊस थांबला आहे. तर नाशिक, जळगावात पावसाने विश्रांती घेतली आहे.
