Maharashtra Rain Forecast : येत्या 6-7 दिवसांत….महाराष्ट्राची चिंता वाढणार? IMD कडून ‘या’ राज्यांना अलर्ट

Maharashtra Rain Forecast : येत्या 6-7 दिवसांत….महाराष्ट्राची चिंता वाढणार? IMD कडून ‘या’ राज्यांना अलर्ट

| Updated on: May 28, 2025 | 9:53 AM

राज्यात सहा ते सात दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात सहा सात दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही भागांना रेड अलर्ट आहे. महाराष्ट्रात सहा सात दिवसात अतिवृष्टी सदृश्य ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय. राज्यातील अनेक भागांना रेड अलर्ट महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 27 मे रोजी कोकणासह पश्चिम घाट माथा पायाथा परिसरात पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर 27 मे ते 2 जून या काळात मध्य महाराष्ट्र सह कोकणात पावसाचा इशारा देण्यात आलाय. विजांच्या कडकडाटसह मुसळधार पावसाचा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केलाय. 40 ते 50 किमी प्रतितास वारे वाहतील असाही अंदाज आहे. मराठवाड्यात 27 ते 29 मे या कालात वाऱ्यांचा वेग 50 ते 60 किमी प्रतितास असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

Published on: May 28, 2025 09:53 AM