Maharashtra Rain : समुद्र खवळला, कोकणाला रेड अलर्ट; ‘या’ जिल्ह्यात धुव्वाधार तर मुंबई-ठाण्यात कसा होणार पाऊस?

Maharashtra Rain : समुद्र खवळला, कोकणाला रेड अलर्ट; ‘या’ जिल्ह्यात धुव्वाधार तर मुंबई-ठाण्यात कसा होणार पाऊस?

| Updated on: Jul 24, 2025 | 1:19 PM

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून या तीनही जिल्ह्यातील समुद्र चांगलाच खवळलेला दिसत आहे. त्यामुळे समुद्रात कोणत्याही पर्यटकानं जाऊ नये, सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यभरात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. गेल्या काही तासांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अशातच हवामान खात्याकडून कोकणाला पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय. समुद्राला उधाण आलं असून समुद्रात आज उंच लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर यासह काही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे, नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Published on: Jul 24, 2025 01:19 PM