Mumbai rain : पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू, तुफान वाऱ्यासह मुसळधार, मुंबईसह उपनगरात कुठे पावसाचं कमबॅक?
मुंबईतील काही भागात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. कांदिवली, ठाणे, बोरीवली, दहिसर, लोअर परेल यासारख्या भागात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून झोडपणाऱ्या मुसळधार पावसाने काही तास विश्रांती घेतली होती. त्यानंतर मुंबई आणि उपनगरात पुन्हा एकदा जोरदार पावसाचं कमबॅक पाहायला मिळत आहे. सकाळपासून मुंबईतील आकाशात मळभ पाहायला मिळत होत तर ढगाळ वातावरण असतानाच पावसाने पुन्हा जोरदार एन्ट्री घेतली आहे. कल्याण डोबिंवली ठाणे दादर या भागात मुसळधार पाऊस सुरू झालाय. तर सुरू झालेल्या पावसाचा रेल्वे रेल्वेवर परिणाम होताना दिसतोय. मध्य रेल्वेची वाहतून १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, अंधेरी, गोरेगाव या भागात पावसाने झोडपण्यास सुरूवात केली आहे. यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. बघा कुठे कशी काय आहे सध्या परिस्थिती?
Published on: May 28, 2025 03:46 PM
