Mumbai | कोरोना काळात व्यापाऱ्यांचे 50 टक्के व्याज माफ करा, व्यापारी संघटनांची मागणी

| Updated on: Jun 23, 2021 | 12:35 PM

कोरोना संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील व्यापारी समाजाने आता पंतप्रधान मोदी यांच्याकडे धाव घेतली आहे. राज्यातील व्यापाऱ्यांनी (Traders) ट्रेडर्स ऑफ युनायटेड फ्रंटची स्थापना करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात व्यापाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आर्थिक दिलासा देण्याची मागणी केली आहे. 

Follow us on

ज्या व्यापाऱ्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांना कोविड काळातील 50 टक्के व्याज माफ व्हावे. तसेच 50 लाखांपेक्षा जास्तीच्या कर्जासाठी तीन महिन्यांचे व्याज माफ करा. लघू उद्योजकांना एसएमई युनिट जारी करावे आणि व्यापाऱ्यांना जीएसटीचा परतावा द्यावा, अशा मागण्या या पत्रातून करण्यात आल्याचे एफआरटीएचे अध्यक्ष विरेन शाह यांनी सांगितले.