Maharashtra Unlock : महाराष्ट्रात पुन्हा अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार, कशी असेल ही प्रक्रिया?

| Updated on: May 24, 2021 | 4:31 PM

Maharashtra Unlock : महाराष्ट्रात पुन्हा अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार, कशी असेल ही प्रक्रिया?

Follow us on

मुंबई: 1 जूनपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन शिथील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे घटते प्रमाण, त्याच्यासोबतच लसीकरणाचं नियोजन यामुळे राज्यातील अनेक गोष्टी 1 जूनपासून सुरु होतील असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

राज्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण घटून 10 टक्क्यांपेक्षा खाली आले, तर टप्प्याटप्प्याने अनेक नियम शिथिल केले जाऊ शकतात. राज्यात ‘ब्रेक द चैन’ अंतर्गत सरकारने 14 एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर केला होता.त्यानंतर कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली होती, असं राजेश टोपे म्हणाले होते.