Maharashtra Weather : धोका वाढला, पावसाबद्दल हवामान विभागाकडून मोठी अपडेट, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather : धोका वाढला, पावसाबद्दल हवामान विभागाकडून मोठी अपडेट, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

| Updated on: Aug 28, 2025 | 3:05 PM

गणेशोत्सवात पुढील काही दिवस पावसाचा जोर राज्यातील काही भागात कायम राहणार असून गुरूवारी विदर्भातील काही भागात पाऊस चांगलाच झोडपून काढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे.

गणेशोत्सवादरम्यान काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळणार आहे. तर बीड, लातूर, नांदेड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याकडून हा अलर्ट जारी करताना राज्यातील काही जिल्ह्यात पावसाच्या सरींसह वारे प्रतितास ४० ते ६० किमी वेगाने वाहणार असल्याचेही सांगण्यात आले आहेत. राज्यातील या पाच जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान, हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, लातूर, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पुणे , सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तविली आहे.

Published on: Aug 28, 2025 03:05 PM