Winter Session 2025 : हिवाळी अधिवेशनावर मोर्चांचे सावट, 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी…
नागपूरमध्ये होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनावर ३३ हून अधिक मोर्चे आणि आंदोलने धडकणार आहेत. २२ संघटनांनी धरणे, तर १७ संघटनांनी साखळी उपोषणाची परवानगी मागितली आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन २०२५ मध्ये महाराष्ट्र विधानमंडळावर ३३ हून अधिक मोर्चे आणि आंदोलने धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर येथे ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनासाठी विविध संघटनांनी तयारी पूर्ण केली आहे. प्राप्त माहितीनुसार, ३३ आंदोलन करणाऱ्या संघटनांनी पोलिसांकडे परवानग्या मागितल्या आहेत. यामध्ये २२ संघटनांनी धरणे आंदोलन करण्याची परवानगी मागितली आहे, तर १७ संघटनांनी साखळी उपोषणासाठी अर्ज केला आहे. दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती तसेच चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा संघर्ष समिती यांसारख्या प्रमुख संघटनांनी मोर्चा काढण्याची परवानगी मागितली आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर पाच मोर्चे धडकणार आहेत. ही संख्या पन्नासच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच दरम्यान, बीड जिल्ह्यातील परळी येथील गोपीनाथ मुंडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. शिक्षिका शिकवत नसल्याचा आणि धमकावत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. संबंधित शिक्षिकेचे निलंबन करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली असून, प्रिन्सिपल आणि इतर अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.