फोडाफोडीच राजकारण भाजपनं थांबवावं; फडणवीस यांच्यावर पटोलेंचा पलटवार

फोडाफोडीच राजकारण भाजपनं थांबवावं; फडणवीस यांच्यावर पटोलेंचा पलटवार

| Updated on: Apr 14, 2023 | 11:59 AM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची तीन तोंड ही वेगवेगळ्या दिशेला असतात. तीन भोंगे वेगवेगळ्या टायमाला वाजतात. एक सकाळी 9 ला वाजतो. दुसरा दुपारी 12 ला आणि तिसरा सायंकाळी. पण त्यांच्या बोलण्यात एकमत नाही असे म्हटलं होते

नागपूर : महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीची अवस्था ही काही चांगली नाही. त्यांची तीन तोंड ही वेगवेगळ्या दिशेला असतात. तीन भोंगे वेगवेगळ्या टायमाला वाजतात. एक सकाळी 9 ला वाजतो. दुसरा दुपारी 12 ला आणि तिसरा सायंकाळी. पण त्यांच्या बोलण्यात एकमत नाही असे म्हटलं होते. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे फडणवीस यांच्यावर भडकले. त्यांनी, फडणवीस यांनी टीका करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण ते स्वतःसाठी आणि त्यांच्या बगलबच्चांसाठी जो मंत्रालयात काय नंगानात चाललेला आहे, राज्याची तिजोरी लूटली जात आहे. त्याकडे आधी लक्ष द्यावं असं म्हटलं आहे. तर आमची तोंड कोणाकडे आहेत हे निवडणुकीमध्ये लोक सांगतील. भाजपने हे फोडाफोडी, तोडातोडीचे राजकारण थांबवावं असेही ते म्हणाले.

Published on: Apr 14, 2023 11:59 AM